📢 नागरिकांना आवाहन – आगामी ग्रामसभेस उपस्थित राहून आपले सूचना / अभिप्राय नोंदवावेत. 📢 पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. 📢 ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी ३० सप्टेंबर पर्यंत भरणा करावा, अन्यथा दंड आकारला जाईल. 📢 ग्रामपंचायत रसलपूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

गावाविषयी माहिती

प्रभूश्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले आहेरगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिकजिल्ह्यातील निफाड तालुक्यात दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या पवित्र गोदावरी माता नदीच्या काठी वसलेले टुमदार असे एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३१०७ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १,  शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून द्राक्ष , ऊस, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्यालागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये आहेरगाव  गावाचा मोठा वाटा आहे.

आहेरगाव  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आहेरगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यातआला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

आहेरगाव  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

आहेरगाव  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे१८  कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून ३८  किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ८५२  चौ.कि.मी.असून ग्रामपंचायतीमध्ये वार्ड आहेत. एकूण ५९४ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या३१०७ आहे. त्यामध्ये १६१८ पुरुष१४८९  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावा लगत नेत्रावती  नदी आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीयआहे.उन्हाळ्यात तापमान साधारणतः३८°से.पर्यंत जाते, तर हिवाळ्यात°से.पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी६० ते ७० से.मी.पर्जन्यवृष्टी होते.

आहेरगाव  गाव द्राक्षे  कोबी भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.

Creative Graphic Designs

लोकजीवन

आहेरगाव  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असूनकोबी, द्राक्षे  कांदा, मका व हंगामी भाजीपालापिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील वअतिथी देवो भवया विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आहेरगाव गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलक ही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

पुरुष

स्त्रिया

सन २०११ नुसार

एकूण

संस्कृती व परंपरा

आहेरगाव गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविधधार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमआयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळीयांसारखे सण गावातउत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्धसर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावातलोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळयांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिकउपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिलासामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे आहेरगाव  गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर – खंडेराव  महाराज हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

  • हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.

 

  • नेत्रावती नदी  – दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या नेत्रावती नदीमुळे जलसंधारणाची चांगली सोय होते यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन विकास यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.

 

  • महादेव मंदिर – आहेरगाव  गावामध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडात बांधले असून ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान आहे.

 

  • स्मशान भूमी – आहेरगाव  गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.

जवळची गावे

आहेरगाव  गाव नेत्रावती  नदीच्या किनारी वसलेले असून आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे आहेरगाव गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिकव सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेली आहेत.

लोणवाडी पाचोरेवनी पिंपळगाव बसवंत पालखेड ही आहेरगाव आसपासची प्रमुख गावे आहेत.

गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी

ग्रामपंचायत प्रशासन

सौ. मनिषा रामभाऊ मोरे

सरपंच

(+91 ) 94211 27233

श्री. कृष्णा शिवाजी रसाळ

उपसरपंच

(+91 ) 98818 41711

श्री. रामकृष्ण त्र्यंबक शिंदे

सदस्य

(+91 ) 94239 29916

श्री. काशिनाथ नामदेव मोरे

सदस्य

(+91 ) 99210 45353

श्री. बाळू हनुमंत गांगुर्डे

सदस्य

(+91 ) 95520 62792

श्री. गणेश विश्वनाथ निकम

सदस्य

(+91 ) 87668 66403

सौ. धनश्री रावसाहेब गवळी

सदस्य

(+91 ) 99239 35247

सौ. संगिता सुरेश शिंदे

सदस्य

(+91 ) 94234 79139

सौ. लता रामराव रसाळ

सदस्य

(+91 ) 90216 66351

सौ. लक्ष्मीबाई जालिंदर जाधव

सदस्य

(+91 ) 74999 33798

सौ. स्वाती अशोक बागुल

सदस्य

(+91 ) 95450 44190

समन्वय कर्मचारी

अ.नं. नाव विभाग पद संपर्क क्रमांक
1. श्रीमती. हिमगौरी पंडितराव आहेर ग्रामपंचायत अधिकारी (+91) 94051 78008
2. सौ. शितल पंकज पाटील ग्राम महसूल अधिकारी (+91) 72765 14099
3. श्री. भरत कचरू जाधव पोलीस पाटील (+91) 97305 96964
4. श्री. अशोक जायभावे सहाय्यक कृषी अधिकारी (+91) 98813 15433
5. श्री. कोमल नितीन जहागिरदार कोतवाल (+91) 92732 59123
6. श्री. विनोद कचरू जाधव ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 95619 95862
7. श्री. संतोष विष्णू निकम ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 99211 07030
8. श्री. विष्णू रमेश रसाळ ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 94036 10338
9. श्री. सिद्धार्थ रविंद्र निकम ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 99231 88606
10. सौ. पूजा राकेश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी (+91) 94209 62932

ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले

जन्म नोंद दाखला

मृत्यु नोंद दाखला

विवाह नोंदणी दाखला

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला

निराधार असल्याचा दाखला

नमुना ८ चा उतारा

शिक्षण विभाग

अंगणवाडी विभाग

विद्यार्थी संख्या

अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी 1 07 07 14
अंगणवाडी 2 08 05 13
एकूण 15 12 27

अंगणवाडी सेविका माहिती

अ.नं. नाव पद नाम संपर्क क्रमांक
1. सौ. शीला संजय पवार अंगणवाडी सेविका (+91) 90117 56405
2. सौ. आशा शिवाजी देशमुख अंगणवाडी मदतनीस (+91) 98817 48290
3. सौ. शकुंतला फकीरा संत अंगणवाडी मदतनीस (+91) 88881 71530

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेरगाव

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुले मुली एकूण
पहिली 11 15 26
दुसरी 03 13 16
तिसरी 18 10 28
चौथी 10 14 24
पाचवी 21 17 38
सहावी 19 15 34
सातवी 17 17 34
एकूण 99 101 200

शिक्षक माहिती

अ.नं. नाव संपर्क क्रमांक
1. श्री. साहेबराव पुंडलिक जाधव (+91) 94034 99861
2. श्री. रतन धना अहिरे (+91) 94239 29439

आरोग्य विभाग

अ.नं. नाव आरोग्य विभाग पद संपर्क क्रमांक
1. डॉ. सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी (+91) 94227 57565
2. पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी
3. उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी
4. श्री.अशोक खरात आरोग्य सेवक (+91) 84840 02674
5. आरोग्य सेविका
6. सौ. स्वाती नरेंद्र देशमुख आशा वर्कर (+91) 90224 12034
7. सौ.संगिता मोहन जाधव आशा वर्कर (+91) 96897 21505

बचत गट

CRP : सौ. सिंधु योगेश उन्हाळे

अ.नं. नाव
1. समृद्धी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
2. सरस्वती समृद्धी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
3. माउली समृद्धी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
4. प्रगती स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
5. श्री राधा कृष्ण स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
6. सप्तश्रुंगी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
7. तुळजा भवानी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
8. राजनंदिनी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
9. ओम साई राम स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
10. नेत्रावती स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
11. जय बाबाजी स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
12. जय श्रीराम स्वयंम सहायता महिला समूह बचत गट
13. शिव छत्रपती स्वयंम सहायता महिला समूह बचत गट

कृषी विभाग